Pune News : पुणे मेट्रोची ट्रायल रन यशस्वी, पहा व्हिडीओ

एमपीसी न्यूज : पुणे मेट्रोच्या कामाला वेग आला असून वनाज ते आयडियल कॉलनी या मार्गावरील ट्रायल रन आज सकाळी (ता. ३०, शुक्रवारी) 7:15 ला वनाज येथून पुणे मेट्रोची ट्रायल सुरू झाली. आयडीयल कॉलनी चौका दरम्यान च्या अंतरामध्ये हि यशस्वी चाचणी पूर्ण झाली.

उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे, महापौर मुरलीधर मोहोळ, आयुक्त विक्रम कुमार, पुणे मेट्रोचे ब्रजेश दीक्षित उपस्थित होते. पुणे मेट्रो च्या स्वागतासाठी पौड रस्त्याच्या दुतर्फा कोथरूडकर उत्साहाने थांबले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.