Pune : महापालिकेच्या अधिकारांवर गदा ? पुणे मेट्रोला स्पेशल प्लॅनिंग अॅथॉरिटीचा दर्जा देण्याचा प्रस्ताव

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशनने (महामेट्रो) पुणे मेट्रोला नागपूर मेट्रोप्रमाणे विशेष नियोजन प्राधिकरणाचा (स्पेशल प्लॅनिंग अॅथॉरिटी) दर्जा देण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला दिला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास मेट्रोला बांधकामांना संदर्भातील कोणत्याही परवागीसाठी महापालिकेकडे जाण्याची आवश्यकता राहणार नाही. त्यामुळे पालिकेच्या अधिकारांवर गदा येणार असल्याचे बोलले जात आहे. मेट्रोच्या कार्यक्षेत्रात येणा-या सर्व बांधकामांचे नकाशे व अन्य मंजुरीसाठी विशेष नियोजन प्राधिकरण (स्पेशल प्लॉनिंग अॅथॉरिटी) स्थापन करण्याचा प्रस्ताव देऊन महामेट्रोने राज्य शासनाला दिला आहे.

याविषयी राज्य सरकार लवकरच अधिसूचना जारी करणार असल्याचे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले. दीक्षित म्हणाले, “सिव्हिल कोर्ट स्टेशन, स्वारगेट आणि शिवाजीनगर येथील बहुमजली मल्टी मॉडेल हब, काही व्यावसायिक इमारतींची योजना आखली आहे. मेट्रो स्टेशनजवळ काही व्यावसायिक योजनांचे देखील नियोजन आहे. यातून मेट्रोला नॉन-तिकीट कमाई मिळणार आहे. मेट्रोने सिव्हिल कोर्ट जंक्शन येथे शहरातील सर्वात उंच इमारतीची योजना आखली आहे”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.