Pune : राज्यात डिसेंबरमध्ये मध्यावधी निवडणूक होणार -चंद्रकांत पाटील

काँग्रेसने हळूहळू शिवसेनेला हिंदुत्वापासून दूर नेले

एमपीसी न्यूज – कोणी कोणाचा विश्वास घात केला?, ते लवकरच कळणार आहे. छातीठोकपणे, हे सरकार चालणार, असे कोणीही म्हणू शकत नाही, असे सांगत येत्या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात राज्यात मध्यावधी निवडणूक होणार असल्याचे भाकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेता धीरज घाटे, नगरसेवक दिलीप वेडेपाटील, सुशील मेंगडे, नगरसेविका श्रद्धा प्रभुणे आदी उपस्थित होत्या.

भाजपने आमचा विश्वासघात केल्याचा आरोप मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दैनिक ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत केला होता. त्यावर पत्रकारांनी विचारणा केली असता, पाटील यांनी भाकीत व्यक्त केले. विरोधी पक्ष म्हणून आम्ही सक्षमपणे काम करू. कोणीच सरकार चालवले नाही, तर निवडणूक होतील. लोक त्याचे उत्तर देतील. भाजपने कोणाबरोबर सरकार चालवावे?, कोणी कोणाचा विश्वास घात केला?, ते स्पष्ट होणार आहे. भाजप निवडणुकीला तयार आहे. नोव्हेंबर-डिसेंम्बरमध्ये निवडणूक होतील, असे पाटील म्हणाले. मात्र, आपण कोणताही जोतिष्य नसल्याचे सांगायलाही ते विसरले नाही.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, नागरिकता संशोधन बिल मुले कोणाचे नुकसान होणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. भाजपच्या भूमिकेला ते सहमत आहेत, म्हणून हा कायदा राज्यात लागू करा, ही आंदोलने थांबले पाहिजे. याला सरकारी वरदहस्त आहे का?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आंदोलनकर्ते पंतप्रधानांना शिव्या घालतात. हिंदुत्वपासून शिवसेनेला काँग्रेसने हळूहळू दूर केले. एका शर्ट काढला, एक पॅन्ट काढला, आशा शब्दांत पाटील यांनी टीका केली.

  • मराठा समाज मागास!
    मागास आयोग निर्मिती केल्यानंतर मराठा समाज मागास असल्याचे समोर आले. 13 टक्के नोकरी, तर 12 टक्के शिक्षणात आरक्षण देण्याचा निर्णय झाला. त्यावर मराठा समाज समाधानी झाला. सुप्रीम कोर्टाने स्थगिती देण्यास नकार दिला. दि. 17 मार्चला यासंदर्भात अंतिम सुनावणी होणार आहे. त्यासाठी राज्य शासनाला खूप तयारी करावी लागेल. आम्ही हॉलमध्ये हायकोर्ट भरायचो, मागास आयोगाचा अहवाल व्यवस्थित अभ्यास केला. 50 टक्के आरक्षण क्रॉस अपवादात्मक परिस्थितीत देता येते. हायकोर्टाने मान्य केले. सुप्रीम कोर्टात टिकले तर मराठा समाजाला कायमस्वरूपी आरक्षण मिळेल. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्वांनी एकजुट दाखवावी. आम्हालाही विश्वासात घ्या, शासनाने भूमिका घ्यावी, असे आवाहन पाटील यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.