Pune: MIDC, IT कंपन्या, शासकीय, खासगी संस्थांना pmpml च्या बसेस भाड्याने देण्याचा निर्णय

Pune: MIDC, IT companies, government, private organizations to rent pmpml buses लॉकडाऊन नियमावलीच्या अधीन राहून मासिक करारावर कंपनीचे कर्मचारी ने -आण करण्यात येणार आहे.

एमपीसी न्यूज- कोरोनाच्या संकटाचा परिणाम पीएमपीएमएलच्या उत्पन्नावर झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर एमआयडीसी कंपन्या, शासकीय, खासगी संस्था आणि आयटी कंपन्यांना पीएमपीएमएलच्या बसेस भाड्याने देण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

लॉकडाऊन नियमावलीच्या अधीन राहून मासिक करारावर कंपनीचे कर्मचारी ने -आण करण्यात येणार आहे. पीएमपी भाडेतत्वावर बसेसना दरामध्ये भरघोस सवलत आणि सुट देण्यात येणार आहे. सध्याचा लॉकडाऊन काळ आणि महामंडळाचे नीचांकी उत्पन्न विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

चाकण, हिंजवडी, भोसरी, चिंचवड आदी एमआयडीसी कंपन्या, शासकीय, खासगी संस्था तसेच आयटी कंपन्याना लाँकडाऊन नियमावलीच्या अधीन राहून मासिक करारावर कंपनीचे कर्मचारी ने -आण करण्यासाठी बसेस देण्यात येणार आहेत.

_MPC_DIR_MPU_II

प्रतिमाह किमान २००० किमी आकारणी आणि प्रति किमी ८३ रुपये ५० पैसे दराने बील आकारणी प्रमाणे बसेस देण्याचे नियोजन होते. परंतु, हा दर जास्त असल्याचे हिंजवडी असोशिएशन व इतर कंपन्यानी कळविल्याने आवश्यक प्रतिसाद मिळाला नाही.

मागील तीन महिन्यांत बुडालेले १५० कोटी रुपये उत्पन्न, संचलनाविना शिल्लक बसेसची संख्या, कर्मचारी वेतन खर्च आदी विचारात घेता मनपाकडे कर्मचारी बदली सोबतच कंपन्याना बसेस देणे, यावरही भर देण्याबाबतीत संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.

त्यानुसार सीपीके ऐवजी ईपीकेनुसार बसेस भाड्याने बसेस देण्याबाबतीत संचालक मंडळाने तत्वताः मान्यता दिलेली आहे. त्यानुसार महामंडळाचे उत्पन्न प्रतिकिमी जवळपास ५० रुपये असल्याने ५० ते ६० रुपये दराने बसेस भाड्याने देण्यात येणार आहेत.

जवळच्या डेपोतून कंपन्यांच्या सोईनुसार विहीत वेळेत दररोज बसेस उपलब्ध करण्यात येतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.