Pune : सरकार फक्त हिंदू विचारांचं – हिंदू हिताचंच आणा !; हिंदू संघटनांचे शिवसेना – भाजपला आवाहन

एमपीसी न्यूज – राज्यात शिवसेना – भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असताना, हे दोन्ही पक्ष मुख्यमंत्री खुर्चीसाठी भांडत आहेत. या दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन हिंदू विचारांचं, हिंदू हिताचच सरकार आणा, असे आवाहन हिंदू संघटनांनी आज पुण्यातील पत्रकार परिषदेत केले.

बहुसंख्य मतदारांचा अपमान आणि विश्वासघात कदापिही या जन्मी करू नका ! सरकार फक्त हिंदू विचारांचं – हिंदू हिताचच ! असा इशारा देऊन
भाजप आणि शिवसेनेला एकत्र येण्याचे आवाहन पुण्यातील सर्व हिंदू संघटनांनी केले आहे. यावेळी मिलिंद एकबोटे, सुनील घनवट, अनिल पवार, शाम महाराज राठोड, समीर कुलकर्णी यावेळी उपस्थित होते. हिंदू महासभा, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदू एकता आंदोलन, समस्त हिंदू आघाडी, पतीत पावन संघटना, राजे शिवराय प्रतिष्ठान, अभिनव निर्माण प्रतिष्ठान व इतर ८ संघटनांनी केले आहे.

आमच्या संघटनांच्या या मागणीला संभाजी भिडे गुरुजी यांचा पाठिंबा असल्याचे मिलिंद एकबोटे म्हणाले. भिडे गुरुजी आज लग्नसमारंभाला येणार होते. पण, ते रात्रीच येऊन गेल्याचेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like