Pune: एमआयएमचे अनिस सुंडके यांची उमेदवारी पराभवाच्या भीतीपोटी, भाजपाचे पडद्यामागील षडयंत्र – ऍड. अभय छाजेड

एमपीसी न्यूज – पुणे लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडी (Pune)व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना जनतेतून प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत असल्यामुळे, एमआयएमचे अनिस सुंडके यांची उमेदवारी जाहीर करण्याचे पडद्यामागील षडयंत्र भारतीय जनता पक्षाने रचले असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲड अभय छाजेड यांनी केला.

 

ॲड अभय छाजेड म्हणाले, अनिस सुंडके हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ( अजित पवार गट ) यामध्ये होते (Pune)पुण्यात भाजपाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा पराभव होण्याच्या शक्यतेच्या भीतीपोटी भाजपाने अनिस सुंडके यांचा एमआयएममध्ये प्रवेश घडवून आणला.

 

त्यांना एमआयएमतर्फे पुण्यात उमेदवारी मिळेल अशी व्यवस्था केली हे स्पष्ट दिसत आहे.

अनिस सुंडके यांनी अनेक वेळा सोयीस्कर भूमिका घेऊन पक्ष बदलले आहेत. त्यामुळेच त्यांच्या पक्षनिष्ठेबद्दल प्रश्नचिन्ह उभे राहिले असून अशा एमआयएम उमेदवाराला मुस्लीम समाज मतदान करणार नाही. काँग्रेस पक्षाने बहुसंख्यांकां प्रमाणेच अल्पसंख्यांक समाजासाठी देखील मोठे योगदान दिले असून, त्यामुळे अल्पसंख्यांकांची मते देखील काँग्रेस पक्षाला पडतील आणि भाजपाचे एमआयएम चा उमेदवार पुण्यात उभा करण्याचे षडयंत्र अयशस्वी होईल.

 

Pune: मनसे महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी घेणार मेळावे – राजेंद्र वागस्कर 

महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर मोठ्या मताधिक्क्याने विजयी होतील, असा विश्वास ॲड. अभय छाजेड यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की, तेलंगणा विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस पास्खला रोखण्यासाठी भाजपाने एमआयएमचे अनेक उमेदवार तिथल्या काँग्रेस विरोधी उभे करण्याचे षडयंत्र रचले होते.

 

एमआयएम हा पक्ष भाजपचा “B टीम” म्हणून ओळखला जातो. देशामध्ये भाजपाने याच B टीमचा वापर केला आहे, मात्र, देशात आणि तेलंगणामध्ये देखील त्याचा फायदा भाजपाला झाला नाही. तेलंगणामध्ये एमआयएमचे अनेक उमेदवार उभे करायला लाऊनाही काँग्रेस पक्ष सगळीकडे विजयी झाला व भाजपाचे मनसुबे धुळीस मिळाले, पुण्यातही असेच घडेल, असा विश्वास ॲड. अभय छाजेड यांनी व्यक्त केला.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.