Pune : अल्पवयीन मुलीचा पाठलाग, पळवून नेण्याची धमकी; आरोपी विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : 16 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या (Pune) इंस्टाग्राम अकाउंटवर मेसेज पाठवले. तिचा पाठलाग केला. इतकेच नाही तर तू माझ्याबरोबर आली नाही तर तुला पळून घेऊन जाईल अशी धमकीही दिली. हा संपूर्ण प्रकार भारती विद्यापीठ आणि मुंडवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत वेळोवेळी घडला.
सोळा वर्षीय पीडित मुलीने याप्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार शाहिद अन्वर शेख (वय 21, रा. जाधव वस्ती,) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 13 मे ते 29 मे या कालावधीत हा संपूर्ण प्रकार घडला.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, सर्वात आधी फिर्यादी तरुणीच्या instagram आयडी वर मेसेज पाठवले. त्यानंतर फिर्यादी ही एमएससीआयटीचा कोर्स करून रस्त्याने पायी चालत जात असताना आरोपी पाठीमागून गाडीवर आले. तू माझ्यासोबत आली नाही तर तुला दोन वर्षांनी तुझे वय पूर्ण झाल्यानंतर पळून घेऊन जाईल. घरच्यांनी जरी तुझे लग्न दुसरीकडे करून दिले तरी तुला पळून नेईल असे म्हणत भर रस्त्यात फिर्यादीचा हात ओढला. फिर्यादीने विरोध केला असता मारण्याची धमकी देत अश्लील शिवीगाळ केली.
Maharashtra : वाहन चालकांना 1 जुलै पासून मिळणार स्मार्ट कार्ड
तर 29 मे रोजी फिर्यादी या आई-वडिलांसोबत जात असताना (Pune ) आरोपीने तिच्याकडे पाहून अश्लील इशारे केले. हाताने इशारा करून फोन करण्यास सांगितले आणि फोन केला नाही तर मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.