Pune Crime News : गणपती दाखवण्याच्या निमित्ताने अल्पवयीन मुलीला घेऊन जात अत्याचाराचा प्रयत्न, तिघांना अटक

एमपीसी न्यूज – गणपती दाखविण्यासाठी घेऊन जात अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा धक्कादायक प्रकार घडला असून याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

अविराज चंद्रकांत कांबळे (वय 21), साहिल दादूसाहब शेख (वय 22) व तन्वीर अहमद बंकापूर (वय 21) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पीडित मुलीच्या आईने याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, आरोपींनी फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीला एकटे पाहून तिचा पाठलाग करत विनयभंग केला. तिचा संपर्क क्रमांक मिळवून वारंवार तिला फोन करून भेटण्यासाठी बोलावले आणि न आल्यास कुटुंबांना ठार मारण्याची धमकी दिली, शिवाय तिला खडकी आणि हडपसर भागात भेटण्यास बोलून अश्लील वर्तन केले.

दरम्यान, तिला गणपती पाहण्याचे निमित्ताने आरोपींनी तिला पळवून नेले आणि हडपसर परिसरात नेऊन आरोपी साहिल शेख याने तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तिघांनाही अटक केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.