Pune: महाराष्ट्र हौसिंग बोर्डातून ज्येष्ठ नागरिक बेपत्ता

एमपीसी न्यूज – बाजारात जाऊन येतो, असे कुटुंबियांना सांगून घराबाहेर पडलेले श्यामराव रामभाऊ मोहिते (वय – 76, रा. महाराष्ट्र हौसिंग बोर्ड एम 5, नागपूर चाळ) हे बेपत्ता झाले आहेत. सोमवारी (दि.30) रात्रीपासून ते घरी परतलेले नाहीत.

_MPC_DIR_MPU_II

त्यांनी अंगात निळया रंगाचा शर्ट, चॉकलेटी रंगाची शॉर्ट पँट परिधान केली आहे. पाच फुट उंच, पांढरे केस, मिशी असे त्यांचे वर्णन आहे. त्यांना मराठी बोलता येते. या वर्णनाची व्यक्ती कोणाला दिसून आल्यास येरवडा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.

सामाजिक कार्यकर्ते, गजराज मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा निळकंठेश्वर मंदिराचे अध्यक्ष राकेश मोहिते यांचे ते वडिल आहेत. अधिक माहितीसाठी 7499776149 अथवा 9850304099 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.