Pune : एमआयटी शाळेच्या मनमानी विरोधात पालकांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

एमपीसी न्यूज – कोथरूड येथील एमआयटी विश्वशांती गुरुकुलमध्ये एसएससी बोर्ड बंद करून सीबीएसई बोर्ड लागू करण्याचा निर्णय शाळा प्रशासनाने घेतला आहे. या संदर्भात पालकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले.

एमआयटी विश्वशांती गुरुकुलमध्ये अचानक नवीन शैक्षणिक वर्षांपासून एसएससी बोर्ड बंद करून सीबीएसई बोर्ड लागू करण्याचा निर्णय शाळा प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयाच्या विरोधात पालकांनी आपल्या पाल्याना घेऊन शाळेच्या समोर उभे राहून आंदोलन केले होते. या निर्णयासंदर्भात पालकांनी आज राज ठाकरे यांनी भेट घेऊन हा प्रश्न सोडविण्याची विनंती केली. 400 ते 500 पालकांच्या सह्यांचे निवेदन राज ठाकरे यांना देण्यात आले.

या विषयात लक्ष घालून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन राज ठाकरे यांनी दिले. यावेळी माजी नगरसेवक किशोर शिंदे, प्रशांत कनोजिया आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like