Pune  : आमदार मुक्ता टिळक आणि त्यांच्या आई ‘कोरोना पॉझिटिव्ह’

MLA Mukta Tilak and his mother 'Corona Positive':मागील आठवड्यात मुक्ता टिळक यांच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन झाले होते

एमपीसी न्यूज – कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांच्यासह  त्यांच्या आईचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.   खुद्द मुक्ता टिळक यांनी ट्विट करून ही माहिती  दिली आहे.

मागील आठवड्यात मुक्ता टिळक यांच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन झाले होते. त्यानंतर त्यांच्या सर्व सदस्यांची कोरोना चाचणी करण्यात आली.

कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या मुक्ता टिळक आणि त्यांच्या आईची प्रकृती स्थिर आहे. त्यांना कोणतीही लक्षणे नसल्याने  डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच उपचारासाठी विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

यापूर्वी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार योगेश टिळेकर, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ  यांना कोरोनाची लागण झाली आहे. राजकीय व्यक्तींचा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वावर होत असल्याने त्यांनी अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे.

तसेच  पुणे महापालिकेच्या नगरसेवकांनाही मोठ्या प्रमाणात कोरोनाची बाधा झाली आहे.  वेळीच उपचार घेतल्याने त्यांनी कोरोनावर रोगावर मात केली होती.

पुणे शहरात कोरोनाचे सध्या 22 हजार 381 रुग्ण झाले आहेत. तर, 13 हजार 739 नागरिकांनी कोरोनावर  मात केली आहे. रोज कोरोनाच्या 4 हजारांच्या वर चाचण्या करण्यात येत आहेत. त्यामुळे रोज 800 च्या वर रुग्ण आढळून येत आहेत.

चाचण्या वाढल्याने रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.