Pune: आमदार मुक्ता टिळक यांची कोरोनावर मात

Pune: MLA Mukta Tilak defeats Corona

एमपीसी न्यूज – कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि त्यांच्या आईंनी कोरोनावर मात केली आहे. आज (दि. 23 जुलै) लोकमान्य टिळकांची जयंती आहे. मी आणि माझी आई आपल्या सर्वांच्या सदिच्छा आणि शुभेच्छांमुळे कोरोनाच्या मोठ्या संकटातून सुखरूपपणे बाहेर पडलो आहोत. पुन्हा एकदा जोमाने कामाला सुरुवात, अशी महत्वपूर्ण घोषणा खुद्द मुक्ता टिळक यांनी ट्विटरवर दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

 दिनांक 7 जुलै रोजी मुक्ता टिळक आणि त्यांच्या आईला कोरोनाची लागण झाली होती. यापूर्वी मुक्ता टिळक यांच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन झाले होते. त्यानंतर त्यांच्या सर्व सदस्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर उपचार करण्यात आले.

यापूर्वी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार योगेश टिळेकर, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, 7 ते 8 नगरसेवक आणि त्यांच्या नातेवाईकांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी वेळीच उपचार घेऊन कोरोनावर मात केली. राजकीय व्यक्तींचा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वावर होत असल्याने त्यांनी अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे.

पुणे महापालिकेच्या नगरसेवकांनाही मोठ्या प्रमाणात लागण झाली आहे. त्यांनी वेळीच उपचार घेतल्याने या रोगावर मात केली होती. सध्या कोरोनाच्या 7 हजारांच्या पुढे चाचण्या वाढल्याने रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

सध्या पुणे शहरात कोरोनाचे 42 हजार 466 रुग्ण आहेत. 25 हजार 129 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शहरात 16 हजार 269 सक्रिय रुग्ण आहेत. दरम्यान, कोरोना झाला म्हणून काहीही घाबरण्याचे कारण नाही. फक्त काळजी घ्यावी. वेळीच उपचार घेतल्यास कोरोना बरा होऊ शकतो, हे अनेकांनी दाखवून दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.