Pune: गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याच्या निर्णयाचे स्वागत-आमदार सिद्धार्थ शिरोळे

Pune: MLA Siddharth Shirole welcomes the decision to celebrate Ganeshotsav simply

0

एमपीसी न्यूज  – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय प्रमुख गणपती मंडळांनी घेतला आहे. त्यांच्या निर्णयाचे मी स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली आहे.

शहराच्या गणेशोत्सवातील महत्त्वाच्या अशा या निर्णयाचे अनुकरण शहरातील अन्य मंडळांनीही करावे, असे आवाहनही आमदार शिरोळे यांनी केले आहे.

ऐतिहासिक आणि सांस्कृतिक शहर ही पुण्याची ओळख आहे. या शहराचे ते वैशिष्ट्यही आहे. गणपती मंडळांनीही वेळोवेळी हे वैशिष्ट्य जपले आहे. येथील मंडळांनी उत्सव साजरे करताना नेहमी मूल्यही जपलेली आहेत.

पुण्यात स्वाईन फ्ल्यू ची साथ आली होती तेव्हाही गणपती मंडळांनी परिस्थितीचे भान राखून उत्सव साधेपणाने केला होता. याही वेळी मंडळांनी असाच महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन सामाजिक भान राखले आहे. साथीची सध्याची परिस्थिती पाहाता उत्सव साधेपणाने करण्याचाच निर्णय योग्य आहे. त्यासाठी गणेश मंडळांच्या सर्व प्रमुखांचे मी अभिनंदन करतो, असेही शिरोळे यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like