Pune : पाण्यासाठी मनसेचे आंदोलन; पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्याची केली मागणी

एमपीसी न्यूज – पुणेकरांना पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्यात यावा, या मागणीसाठी मंहाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मंगळवारी (दि. २४) दुपारी 4 वाजता आंदोलन केले.

पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांच्या कार्यलयात मनसेच्या माजी नगरसेविका रुपाली पाटील ठोंबरे, काँग्रेसचे कृषिकेश बालगुडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

रिकामे हांडे घेऊन पाण्याची समस्या कुलकर्णी यांना समजावून सांगण्यात येत आहे. पाणी प्रेशरने येत नाही. तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येऊ नये, असे सांगितले होते. त्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होता. आता कसा काय बंद ठेवण्यात येत आहे?, असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.

तर, देखभाल आवश्यक कामे करण्यासाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आल्याची सारवासारव कुलकर्णी यांनी केली. मॉडेल कॉलोनी भागात पाणी मिळत नाही. आता देखभाल दुरुस्ती केल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात कामे करण्यात येणार असल्याचे व्ही. जी. कुलकर्णी यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.