_MPC_DIR_MPU_III

Pune : ‘मनसे-राष्ट्रवादी’ची छुपी युती; उमेदवारांत गोंधळाचे वातावरण

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँगेस यांच्यामध्ये काही मतदारसंघांत छुपी युती झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. तर, कोथरूड मतदारसंघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा पराभव करण्यासाठी काँगेस आणि राष्ट्रवादी उघडपणे मनसेचा प्रचार करीत आहे.

_MPC_DIR_MPU_IV

खडकवासला मतदारसंघात मनसेने उमेदवार दिला नाही. हडपसर मतदारसंघांत नगरसेवक वसंत मोरे तर, कसबा मतदारसंघांत शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी आघाडी आणि युतीचा उमेद्वारांसमोर आव्हान उभे केले आहे. मनसे आणि राष्ट्रवादीने काही मतदारसंघांत छुपी युती केल्याने दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

_MPC_DIR_MPU_II

ईडी चौकशीनंतर राज ठाकरे काय बोलणार?, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. तर, याच ईडीचा चौकशीचा धागा पकडत पवारांनी विधानसभेत भाजपवर हल्लाबोल करणे सुरू केला आहे. येत्या काही दिवसांतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार, अजित पवार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही पुण्यात सभा होणार आहे. त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.

सध्या प्रचार करताना उमेदवारांची मोठी दमछाक होत आहे. 8 – 8 तास पायी चालावे लागत असल्याचे उमेदवारांनी सांगितले. आमदारकीची निवडणूक सोपी नाही. संघर्षाशिवाय पर्याय नसल्याचेही ते म्हणाले.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.