Pune : वीज बिल माफी करण्यासाठी मनसेची निदर्शने

MNS protests for waiver of electricity bill

एमपीसी न्यूज – वीज बिल माफी झालीच पाहिजे, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अलका चौकात आज, सोमवारी जोरदार निदर्शने करण्यात आली. शहराध्यक्ष अजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. सरकारने नुसत्या पोकळ घोषणा न करता वाढीव वीज बिल तातडीने रद्द करून जनतेला दिलासा द्यावा, अन्यथा मनसे यापुढे आक्रमकपणे सरकारविरोधात रस्त्यावर उतरेल, असा इशाराही शिंदे यांनी यावेळी दिला.

मनसेचे प्रल्हाद गवळी, प्रशांत मते, राहुल गवळी, विक्रांत अमराळे, वसंत खुटवड, सुनील कदम, अभिषेक थिटे, राकेश क्षीरसागर, धनंजय दळवी, रोहन उभे, मनोज ठोकळ, उदय गडकरी, आकाश धोत्रे, शेखर बाळे आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांना हालाखीच्या परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने वाढीव वीज बिल आकारणी करून महाराष्ट्राच्या जनतेला मोठा भुर्दंड दिला आहे.

रोजगार धंद्यांची वानवा आणि आखडते उत्पन्न यामुळे मेटाकुटीला आलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने लॉकडाउनच्या काळातील वीज बिले सरसकट माफ करावीत, अशी लेखी मागणी मनसेतर्फे यापूर्वीच मुख्यमंत्री, ऊर्जामंत्री व महावितरणचे मुख्य अभियंता यांच्याकडे केली आहे.

याबाबत निर्णय होईपर्यंत महावितरणने नागरिकांच्या मागे वसुलीचा तगादा लावू नये, मीटरला हाथ लावला तर मनसे आपल्या पद्धतीने त्यांचा सामना करायला समर्थ आहे, असा इशाराही देण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.