Pune : पादचारी तरुणाच्या हातातील मोबाईल हिसकावून दुचाकीवरील चोरटे पसार

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी जाणाऱ्या तरुणाच्या हातातील मोबाइल हिसकावून दुचाकीवरील चोरटे पसार झाल्याची घटना रविवारी (दि 6) पावणे अकराच्या सुमारास प्रभात रोड येथील हरिश्चंद्र मुदोजी चौकात घडली आहे.

याप्रकरणी संकेत टकले (वय 23 रा. प्रभात रोड )यांनी फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभात रोड वरील हरिश्चंद्र मुदोजी चौक येथून फिर्यादी संकेत हा रविवारी सकाळी अकराच्या दरम्यान पायी जात होता. दरम्यान दोन अनोळखी इसम दुचाकीवरून त्याच्या जवळ आले आणि संकेतच्या हातातील तब्बल 30 हजार रुपये किमतीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून चोरून घेऊन गेले.

याप्रकरणी दुचाकीवरील दोन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास डेक्कन पोलिस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.