Pune : पुण्यातील दोन उद्योजकांनी तयार केले ‘ती’च्यासाठी मोबाईल टॉयलेट

एमपीसी न्यूज- आपल्या कल्पक बुद्धीचा वापर केला की नवनिर्मितीचा आनंद मिळतो. बऱ्याचदा हा आनंद स्वतःपुरता मर्यादित न राहता त्याचा उपयोग समाजासाठी केला जाऊन एक चांगली सुविधा निर्माण केली जाते. पुण्यातील दोन उद्योजकांनी असाच आपल्या कल्पकतेचा वापर करून पुणे महानगरपालिकेच्या जुन्या बस गाड्यांचे महिलांसाठीच्या फिरत्या टॉयलेटची निर्मिती केली आहे.

उल्का सादळकर आणि राजीव खर असे या उद्योजकांची नावे आहेत. या दोघांची सरप्लास्ट नावाची कंपनी आहे. ही कंपनी 2016 पासून टॉयलेट निर्मितीचे काम करते. या टॉयलेट्सना ‘ती’ हे नाव देण्यात आले आहे. यामध्ये वेस्टर्न आणि इंडियन दोन्ही प्रकारचे टॉयलेट उपलब्ध असून ५ रुपयांमध्ये ही सेवा महिलांना उपलब्ध करण्यात आली आहे. शिवाय कमी किमतीत सॅनेटरी नॅपकीन देखील देण्यात येत आहेत. स्वच्छ भारत अभियानामध्ये ही टॉयलेट महत्वाची भूमिका बजावत आहेत. या टॉयलेट बस गाड्या सौरऊर्जेवर चालतात. प्रत्येक बससाठी एक महिला कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. स्वच्छतेबाबत जनजागृती होण्यासाठी निर्माण करण्यासाठी या बसेसमध्ये टीव्ही देखील बसवण्यात आले आहेत.

अशा प्रकारच्या फिरत्या टॉयलेटची कल्पना नेमकी कशी सुचली हे सांगताना उल्का सादळकर म्हणाल्या, “आपल्या देशामध्ये महिलांसाठीच्या शौचालयाची मोठी समस्या आहे. पीएमपीएमएलच्या जुन्या बस गाड्यांचा उपयोग बेघरांसाठी घर निर्माण करण्यासाठी होणार असल्याचे आम्ही कुठेतरी ऐकले होते. यावरून या गाड्यांचा उपयोग शौचालय तयार करण्यासाठी होऊ शकतो अशी कल्पना आम्हाला सुचली आणि ती सर्वांना आवडली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.