Pune : नगरसेवक दीपक मानकर यांच्यावरील मोक्का हटवला; पुणे पोलिसांना धक्का

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेचे नगरसेवक दीपक मानकर यांच्यावरील मोक्का उच्च न्यायालयाने हटवला आहे. त्यामुळे पुणे पोलिसांना हा धक्का मानला जात आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे दीपक मानकर यांना जमीन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जितेंद्र जगताप आत्महत्येप्रकरणी मागील दीड वर्षापासून मानकर येरवडा कारागृहात होते.

पुणे पोलिसांनी मानकर यांच्या विरोधात मोक्का लावला होता. त्याविरोधात दीपक मानकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने मानकर यांच्या विरोधातील मोक्का हटविण्याचा आदेश दिला. त्यामुळे मानकर यांना जमीन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

दीपक मानकर यांनी शिवसृष्टी व्हावी, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. कोथरूड कचरा डेपोच्या जागेवरील आरक्षण रद्द करून त्या ठिकाणी मेट्रोच्या डेपोसाठी जागा देण्यात आली. चांदणी चौकातील बिडीपीच्या 50 एकर जागेत भव्य अशी शिवसृष्टी उभारणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही वचननाम्यात भव्य अशी शिवसृष्टी उभारणार असल्याचे वचननाम्यात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.