Pune : मॉडर्नचा सॉफ्ट बॉल संघ विभागीय पातळीवर

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हा परिषद आयोजित क्सॉफ्ट बॉल क्रीडा स्पर्धेत मॉडर्न हायस्कूलच्या 14 वर्षे वयोगटाच्या विद्यार्थ्यांनी उपांत्यफेरीमध्ये विद्याभवन संघावर 14/11 गुणांनी मात करीत विजय संपादन केला. तसेच मॉडर्न इंग्रजी माध्यम संघाने अझम कॅम्प अ्ग्लो उर्दू हायस्कूलच्या संघावर 3/2 ने मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला. मॉडर्न हायस्कूल पुणे विरुद्ध पी.ई.एस इंग्रजी माध्यम पुणे 5/3 ने जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.

_MPC_DIR_MPU_II

या स्पर्धेत मॉडर्न हायस्कूल शिवाजीनगर पुणे संघाची विभागीय स्तरावर निवड झाली. प्रशिक्षक गणपत नांगरे यांचे या संघाला मार्गदर्शन लाभले.प्रशालेच्या मुख्याध्यापिका संगीता लकारे, उपमुख्याध्यापिका रोहिणी काळे, पर्यवेक्षिका सीमा कूळधरण, क्रीडा प्रमुख दादाभाऊ शिलकर, नियामक मंडळ सदस्य प्रमोद शिंदे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विजयी विद्यार्थ्यांचे व क्रीडा शिक्षकाचे अभिनंदन केले. संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. गजानन एकबोटे व संस्थेच्या सहकार्यवाह, नगरसेविका, पुणे महानगरपालिका महिला व बालकल्याण समिती अध्यक्षा प्रा.ज्योत्स्ना एकबोटे यांनी कौतुक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.