Pune : मोदी यांच्या सभेसाठी झाडे तोडण्याचा आम आदमीपार्टीकडून निषेध

आम आदमी पक्षाचे पर्वती मतदार संघातील उमेदवार संदीप सोनावणे यांच्याकडून चौकशीची मागणी

एमपीसी न्यूज- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स प महाविद्यालयातील सभेच्या तयारीसाठी झाडे तोडण्याच्या घटनेचा आम आदमी पक्षाचे पर्वती मतदार संघातील उमेदवार संदीप सोनवणे यांनी निषेध केला असून चौकशीची व गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. पंतप्रधानांनी मागील आठवड्यात दाखवलेले निसर्ग प्रेम खोटे आणि दिखाऊ असल्याचे या घटनेवरून सिद्ध झाले आहे, असे सोनावणे यांनी म्हटले आहे.

_MPC_DIR_MPU_II

याबाबत प्रसिद्दीस दिलेल्या पत्रकात सोनावणे यांनी म्हटले आहे की, आरे जंगल तोडीची घटना असो किंवा मुख्यमंत्र्यांच्या रथासाठी सिंहगड रस्त्यावरील झाडे तोडण्याचे प्रकरण असो ,भारतीय जनता पक्ष मुजोरपणे वागत असून सर्रास पणे नियम आणि निसर्गाची पायमल्ली करीत आहे.त्यामुळे भाजपला निवडणुकीत पराभूत करून निसर्गप्रेमाचा धडा शिकवावा, असे संदीप सोनावणे यांनी आवाहन केले आहे .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.