BNR-HDR-TOP-Mobile

Pune : मोहन जोशी यांच्याकडून काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध 

INA_BLW_TITLE
एमपीसी न्यूज – पुणे लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीच्या उमेदवार मोहन जोशी यांनी आज काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. समता भूमी येथे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर समाजातील विविध घटकातील नागरिकांना एकत्रित करून जाहीरनाम्याचे प्रकाशन केले. 
 
यावेळी विधान परिषदेचे आमदार शरद रणपिसे, माजी आमदार दीप्ती चवधरी तसेच आघाडीतील कार्यकर्ते उपस्थित होते. 
 
  • मोहन जोशी म्हणाले की, देशाची सत्ता युपीएच्या हाती दिल्यास पुणे शहरातील प्रत्येक घरातील एका व्यक्तीला रोजगार दिला जाणार आहे. तसेच आम्ही पुणे शहरातील सार्वजनिक वाहतुक सक्षम करणार, सुरळीत पाणीपुरवठा यासह अनेक समस्येतून पुणेकर नागरिकांना मुक्त करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 
 
यावेळी खऱ्याखुऱ्या आयुष्यातील चौकीदार (सुरक्षा रक्षक) असलेल्या मोहम्मद इस्माईल शेख यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शेख यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, मी मागील सात वर्षापासुन सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत आहे. पण आमच्या कामावरून सध्या सत्ताधारी पक्षाकडून राजकारण केले जात आहे. हे पाहून खूप वाईट वाटते. तर आज काँग्रेस पक्षाच्या जाहीरनामा प्रकाशनास एका सुरक्षा रक्षकास बोलावल्यामुळे समाधान मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
 
  • पंतप्रधान नरेंद्र मोदीसाहेब तुम्ही तर अंबानी, अडाणी, नीरव मोदी आणि मल्ल्याचे चौकीदार आहात. सर्वसामान्य नागरिकांचे चौकीदार नाहीत. अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. 
HB_POST_END_FTR-A4

.