BNR-HDR-TOP-Mobile

Pune: बिबट्याचा हल्ला परतवून लावत आईने वाचविला चिमुकल्याचा जीव

जुन्नर येथे बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षाचा मुलगा जखमी; वायसीएमएच रुग्णालयात उपचार सुरू

INA_BLW_TITLE
एमपीसी न्यूज – दीड वर्षाच्या चिमुकल्यावर झडप घालण्यासाठी बिबट्याच्या रूपांत अक्षरशः काळ आला होता. मात्र चिमुकल्याच्या आईने दुर्गेचे रूप धारण करून आपल्या काळजाच्या तुकड्याला मरणाच्या दारातून परत आणले, याचा प्रत्यय नुकताच जुन्नर येथे आला. बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या या चिमुकल्यावर पिंपरी-चिंचवडच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दीपाली व दिलीप माळी यांना दीड वर्षाचा मुलगा ज्ञानेश्वर असून जुन्नर येथे बिबट्याने अवघ्या दीड वर्षाच्या या चिमुकल्यावर हल्ला चढवला होता. मात्र आई दीपालीने दुर्गेचे रूप घेत बिबट्याला पिटाळून लावलं आणि बाळाला मृ्त्यूच्या दाढेतून सोडवल. आई बाळाला मृत्यूच्या दारातून ओढत होती तर दुसरीकडून बिबट्या चिमुकल्याच्या तोंडाला धरून ओढत होता.
या घटनेत दीड वर्षाचा ज्ञानेश्वर हा जखमी झाला असून त्याच्या डाव्या डोळ्याला गंभीर इजा झाली आहे. त्याच्यावर पिंपरी-चिंचवडच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
HB_POST_END_FTR-A4

.