Pune : मनीलाईफ फाऊंडेशनच्या वतीने माहिती अधिकार कायद्यासंदर्भात कार्यशाळा

एमपीसी न्यूज- माहिती अधिकार कायदा म्हणजे काय ? माहिती अधिकार कायद्याचा वापर कसा करावा या संदर्भात मनीलाईफ फौंडेशनच्या वतीने एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.  शुक्रवारी (दि. 27) बंडगार्डन रस्त्यावरील पूना क्लबच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये संध्याकाळी साडेपाच ते साडेसात या वेळेत ही कार्यशाळा होणार आहे.

या कार्यशाळेमध्ये पहिले माहिती अधिकार आयुक्त शैलेश गांधी, माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार, नागरिक चेतना मंचच्या कनिझ सुखरानी, सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर, वास्तुरचनाकार आणि पर्यावरणवादी सारंग यादवाडकर मार्गदर्शन करणार आहेत. कार्पोरेट सिटीझन आणि मनीलाईफच्या सल्लागार संपादक विनिता देशमुख सूत्रसंचालन करणार आहेत.

ही कार्यशाळा सर्वांसाठी मोफत असून याचा लाभ घेण्यासाठी 022-49205000 / 022- 24441058-59, व्हाट्सअप +91-7045156415 या क्रमांकावर किंवा [email protected] या मेलआयडीवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.