Pune : आय पी एच आणि मुक्तांगणतर्फे आज मासिक सहजीवन सभा

एमपीसी न्यूज- इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजीकल हेल्थच्या वतीने आज, सोमवारी सहजीवन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा संध्याकाळी ६ वाजता कर्वेनगर येथील इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजीकल हेल्थ (आय पी एच) येथे होणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजीकल हेल्थ पुणे व मुक्तांगण यांच्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्तांच्या कुटुंबियांची स्वमदत गट (सहजीवन सभा) आयोजित करण्यात येते. त्यानुसार आज, (सोमवार) ही सहजीवन सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत सोनाली काळे मार्गदर्शन करणार आहेत. या सभेला मुक्तांगण मित्र व सहचरी या दोघांनी जोडीने येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सभेचा पत्ता-
इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजीकल हेल्थ, 4, यशश्री कॉलनी, वेदांतनगरी जवळ, हॉटेल चांदणीच्या समोरच्या गल्लीत, कमिन्स कॉलेज रोड, कर्वे नगर, पुणे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.