Pune : कामगार विरोधी कायद्यास विरोध दर्शविण्यासाठी कामगार संघटनाचा लॉंगमार्च

एमपीसी न्यूज- कामगार विरोधी कायद्याला विरोध करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध करीत देशातील दहा प्रमुख केंद्रीय कामगार संघटनांच्या वतीने दि.8 व 9 जानेवारी रोजी बंद पाळण्यात आला होता. पुणे शहर कामगार संघटना कृती समितीच्यावतीने अलका टॉकीज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर लॉंग मार्चचे आयोजन केले होते.

यामध्ये सरकारी, निमसरकारी, अंगणवाडी, अंगमेहनती, कष्टकरी, पथारी, फेरीवाले, बांधकाम, घरकाम, हमाल बाजार आदी कर्मचारी सहभागी झाले होते. या मोर्चाचे नेतृत्व कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केले. या मोर्चामध्ये पिंपरी-चिंचवड शहर, औद्योगिक वसाहत तसेच भोसरी, चाकण, औद्योगिक वसाहतीमधील विविध कारखांन्यामधील कामगारांनी सहभाग नोंदविला.

या मोर्चामध्ये अड. म. वि. अकोलकर, आयटकचे कॉ. व्ही. व्ही. कदम, कॉ. अनिल रोहम, कॉ. अजित अभ्यंकर, दिलीप पवार, अनिल आवटी, मनोहर गाडेकर आदी सहभागी होऊन जिल्हाधिकारी कार्यालयसमोर कामगारांना मार्गदर्शन केले. केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणाचा यावेळी निषेध करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.