Pune : निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यालाच पुणे लोकसभेची उमेदवारी – अशोक चव्हाण

एमपीसी न्यूज – पुणेकरांना पाहिजे असणाऱ्या आणि निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या उमेदवारालाच पुणे लोकसभेचं तिकीट देण्यात येणार असल्याचे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना आता आघाडीची पुण्यातील जागा काँग्रेसला जवळपास मिळालीच आहे. आता प्रश्न आहे तो काँग्रेसचा उमेदवार कोण असणार? सध्या तरी पुणे लोकसभा मतदारसंघासाठी माजी आमदार मोहन जोशी, नगरसेवक अरविंद शिंदे आणि माजी शहराअध्यक्ष अभय छाजेड यांच्या नावांची शिफारस प्रदेश काँग्रेसने केंद्राकडे केली आहे. त्यामुळे या तिघांपैकी कोण उमेदवारी मिळवणार की ऐनवेळी पक्षप्रवेश करणाऱ्याला उमेदवारी मिळणार याकडे लक्ष लागले आहे.

  • संजय काकडे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या संपर्कात?
    तर दुसरीकडे भाजपचे पुण्यातील सहयोगी खासदार संजय काकडे हे देखील काँग्रेसकडून पुण्यातील जागा लढण्यास इच्छुक असल्याची चर्चा आहे. उमेदवारी मिळावी, यासाठी संजय काकडे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचही बोललं जातंय. त्या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांच विधान खूप महत्वपूर्ण समजलं जातंय.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.