Pune : लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात स्वच्छता व रुग्ण नियोजनावर अधिक लक्ष

सौरभ राव आणि शेखर गायकवाड यांच्या अधिकाऱ्यांना महत्वपूर्ण सूचना

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. याची महापालिका प्रशासनाने गंभीर दाखल घेतली आहे. त्यामुळे लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात स्वच्छता व रुग्ण नियोजनावर अधिक लक्ष राहणार असल्याचे सहकार आयुक्त सौरभ राव आणि महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले.

पुणे मनपा मुख्य भवनातील श्री. छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात मंगळवारी ही बैठक आयोजित केली होती. शेखर गायकवाड अध्यक्षस्थानी होते. सहकार आयुक्त सौरभ राव, पशुसंवर्धन आयुक्त अनिल कवडे, सचिनद्र प्रताप सिंग, अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल, शांतानु गोयल, आरोग्यप्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे, सहमहापालिका आयुक्त ज्ञनेश्वर मोळक, सुरेश जगताप, माधव देशपांडे, विजय दहीभाते, विलास कानडे, उल्का कळसकर व इतर अधिकारी उपस्थित होते.

शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने ते कमी करण्यासाठी आणखी जोमाने काम करण्याची गरज आहे. यापूर्वी स्वच्छ सर्वेक्षण उपक्रम राबविताना अत्यंत नियोजनबद्ध व यशस्वी काम केले आहे. आताही याच धर्तीवर सर्व विभाग व क्षेत्रीय कार्यालयांनी कामकाज करणे आवश्यक आहे.

त्यासाठी स्वच्छता व रुग्ण नियोजनाची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. त्यासाठी स्थानिक वस्ती पातळीवर परिमंडळ आयुक्त व क्षेत्रीय मनपा आयुक्त स्तरावर जलद निर्णय घेउन जलदरीत्या कामकाज केले पाहिजे.

शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्वच्छता झाल्यावर फोटो घेणे, ऐपचा वापर करून नियोजन करावे, भाजी मंडई व सोशल डिस्टनिंग बाबत नियंत्रण करणे अत्यंत महत्वाचे आहे. रेड झोन व ऑरेंज झोनला ग्रीन झोनमध्ये परावर्तित करण्यासाठी युद्धपातळीवर यशस्वी प्रयत्न करा, अशा महत्वपूर्ण सूचना सौरभ राव आणि शेखर गायकवाड यांनी केल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.