Pune Corona Update: Good News! ‘पॉझिटिव्ह’ रुग्णांपेक्षा वाढली ‘डिस्चार्ज’मिळालेल्या रुग्णांची संख्या

More patients discharged than 'positive'; Death of 11 patients

एमपीसीन्यूज – पुणे महापालिकेच्या कोरोनासंबंधित दैनंदिन अहवालातील आजची विशेष बाब म्हणजे पहिल्यांदाच डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांचे प्रमाण नव्या रुग्णांपेक्षा अधिक आहे. दिवसभरात 184 रुग्ण बरे झाले. त्यांंना डिस्चार्ज मिळाला तर 106 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. दिवसभरात  कोरोनाबाधित 11 रुग्णांचा मृत्यू झाला.

महापालिकेच्या आरोग्य खात्याने ही माहिती दिली. सध्या पुण्यात ससून रुग्णालय, नायडू रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयांमध्ये मिळून व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांची संख्या 50 असून क्रिटिकल रुग्णांची संख्या 171 आहे.

पुण्यातील आत्तापर्यंतची पॉझिटिव्ह रुग्ण संख्या5,533 आणि सक्रिय रुग्ण संख्या 2,190 आहे. कोरोनामुळे आतापर्यंत एकूण मृत्यू 283 झाले आहेत. आजपर्यंत एकूण 3,059 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर स्वॅब तपासणी 1,360 इतकी झाली आहे.

दरम्यान,  ससून रुग्णालयात आज, बुधवारी आणखी तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.

या रुग्णालयात आजपर्यंत 153 जण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, 146 जण या रोगामुळे दगावले आहेत.

ससून रुग्णालयात नाना पेठेतील 37 वर्षीय पुरुष, भवानी पेठेतील 60 वर्षीय व मंगळवार पेठेतील 75 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांना कोरोना व्यतिरिक्त उच्चरक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा असेही आजार होते.

तर अन्य रुग्णालयांमध्ये पद्मावती भागातील 90 वर्षीय पुरुषाचा काशीबाई नवले हॉस्पिटलमध्ये, जनवाडी भागातील 55 वर्षीय महिलेचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, येरवड्यातील 38 वर्षीय महिलेचा बुधारणी हॉस्पिटलमध्ये, मार्केटयार्ड भागातील 54 वर्षीय पुरुषाचा नोबेल हॉस्पिटलमध्ये, सिंहगड रोड भागातील 66 वर्षीय पुरुषाचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, वडारवाडी भागातील 60 वर्षीय पुरुषाचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, येरवड्यातील 67 वर्षीय महिलेचा AICTC हॉस्पिटलमध्ये आणि दौंड तालुक्यातील 70 वर्षीय पुरुषाचा काशीबाई नवले हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like