Pune : दिलासादायक बातमी; कोरोनाचे 60 टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण ठणठणीत बरे

More than 60 percent of patients with coronary heart disease recover

एमपीसी न्यूज – कोरोनाचे रुग्ण आणि मृत्यू यामध्ये दिवसेंदिवस वाढत असताना पुणेकरांना एक दिलासादायक बातमी आहे. कोरोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण हे 60 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे कोरोना झाला म्हणून घाबरून जाऊ नये, वेळीच उपचार, काळजी घेतल्यास कोरोनातून मुक्त होता येते, हे बरे झालेल्या रुग्णांनी दाखवून दिले आहे.

पुणे शहरात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण हे केवळ 5 टक्के आहे. शिवाय मृत्यू होणाऱ्या रुग्णांना कोरोना व्यतिरिक्त इतरही आजार असतात. त्यामध्ये लठ्ठपणा, किडनी, हृदयविकार, मधुमेह अशा गंभीर आजारांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे यामध्ये सर्वाधिक मृत्यू हे जेष्ठ नागरिकांचे होत आहेत. गुरुवारी 4 हजार 505 रुग्ण कोरोनातून ठणठणीत बरे झाले आहेत. शहरात आता कोरोनाचे 7 हजार 265 रुग्ण झाले आहेत. तर, आतापर्यंत 361 नागरिक दगावले आहेत.

मागील आठवड्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पन्नास टक्क्याहून अधिक होते. या आठवड्यात हे प्रमाण वाढून साठ टक्क्यांपेक्षा जास्त झाले आहे. पुण्यात सर्वाधिक रुग्ण ताडीवाला रोड – ससून रुग्णालय या प्रभागात आहेत.

१ हजार १०४ बाधित रुग्णांपैकी २५६ रुग्ण ऐक्टिव आहेत. ८४८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सुरुवातीला कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील लोहीयानगर – कासेवाडी प्रभागातील २४६ बाधितांपैकी १६९ रुग्ण बरे होऊन घरी गेले.

याच क्षेत्रीय कार्यालयातंर्गत येणाऱ्या रास्तापेठ – रविवार पेठ प्रभागातील २११ पैकी १८२ जण, खडकमाळ आळी – महात्मा फुले पेठ प्रभागातील ३७१ पैकी ३१३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोनाचे मोठ्या प्रमाणात रुग्ण बरे होत असले तरी पुणेकरांनी काळजी घ्यावी, प्रशासनातर्फे देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.