Pune : पुरस्काराचा आनंद व्यक्त करण्यासाठी पुणे-लोणावळा मार्गावर धावल्या शंभरहून अधिक रॉयल एनफिल्ड इंटरसेप्टर

रॉयल एनफिल्ड इंटरसेप्टर 650 ने जिंकला 'द इंडियन मोटरसायकल ऑफ द इअर 2019 पुरस्कार'

एमपीसी न्यूज – 2019चा इंडियन मोटरसायकल ऑफ द इअर पुरस्कार (आयएमओटीवाय) इंटरसेप्टर 650 ने जिंकला. या विजयाचा आनंद व्यक्त करण्यासाठी आज (रविवारी) सकाळी 100 हून अधिक रॉयल एनफिल्ड इंटरसेप्टर 650 च्या चालकांनी लोणावळ्यापर्यंत प्रवास केला. रॉयल एनफिल्डच्या मार्केटिंग विभागाचे जागतिक प्रमुख शुभरंशू सिंग यांनी या राइडला हिरवा झेंडा दाखवला. इंटरसेप्टर 650 ही रॉयल एनफिल्डची नवी दुहेरी सिलेंडरची मोटरसायकल नोव्हेंबर 2018 मध्ये सादर करण्यात आली आणि डिसेंबरमध्ये तिला आयएमओटीवाय पुरस्कार मिळाला.

रॉयल एनफिल्ड आपल्या क्लासिक थीमवर आधारित रूप, किमान डिझाइन, इंजिनाचा अतुलनिय ‘थंप’ आणि चालवणाऱ्यांमधील सहजता व धाडसी वेगळेपण अशा वैशिष्ट्यांमुळे इतरांहून वेगळी ठरते. रायडिंग समुदायाच्या या भावनांची नव्याने मांडणी करत पुण्यातील रॉयल एनफिल्ड इंटरसेप्टर 650ने रायडिंगवरील आपल्या प्रेमाने आणि 2018-19 मध्ये भारतातील सर्वाधिक लोकप्रिय मिड-सेगमेंट (250-750 सीसी) मोटरसायकल बाळगण्याच्‍या अभिमानाने शहरातील रस्त्यांना व्यापून टाकले. इंटरसेप्टरच्या ताफ्याला सकाळी सात वाजता कोरेगाव पार्क येथे हिरवा झेंडा दाखवण्यात आला. लोणावळ्याला पोहोचल्यानंतर या रायडर्सचे दोन सुंदर कस्टम मोटरसायकल्सनी जंगी स्वागत केले.

  • आयएमओटीवाय हा भारतातील दुचाकी उत्पादनांसाठीचा सर्वात मानाचा पुरस्कार समजला जातो. 2007मध्ये सुरू झालेला हा पुरस्कार भारतातील आघाडीच्या ऑटोमोटिव्ह प्रकाशनांचे प्रतिनिधी असलेल्या आघाडीच्या मोटरसायकल पत्रकार आणि संपादकांकडून दिला जातो. यात अत्यंत कठीण निवड प्रक्रिया आणि ज्युरी राऊंडसमध्ये किंमत, इंधन क्षमता, स्टायलिंग, आरामदायीपणा, सुरक्षितता, परफॉर्मन्स, सुयोग्यता, तांत्रिक नाविन्यता, किमतीचे मोल आणि भारतीय रायडिंग परिस्थितींसाठीची योग्यता अशा महत्त्वाच्या निकषांवर विजेत्यांची निवड केली जाते. 2019साठी इतर अनेक भारतीय आणि जागतिक मोटरसायकल्सच्या तुलनेत रॉयल एनफिल्ड इंटरसेप्टर 650 सर्वोत्कृष्ट ठरली आहे.

याबाबत शुभ्रांशु सिंग म्हणाले, “रॉयल एनफिल्ड इंटरसेप्टर 650ला ‘इंडियन मोटरसायकल ऑफ द इयर’ हा पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे या मोटरसायकला ग्राहक देत असलेला प्रतिसाद तसेच तिच्या विकास व डिझाइनसाठी केलेले प्रयत्नांवर ग्राहकांनी दाखवलेला विश्वास पुन्हा एकदा दिसून आला आहे. महाराष्ट्र ही आमच्यासाठी महत्त्वाची बाजारपेठ आहे. आणि त्यातही पुणे ही बाजारपेठ निर्णायक स्वरूपाची आहे. पुण्यात आज 100 हून अधिक इंटरसेप्टर 650 बघणे हा सुखद अनुभव आहे. इंटरसेप्टर रायडर्सचा समुदाय दिवसेंदिवस वाढत आहे. या भागात मध्यम आकाराच्या मोटरसायकल्स लवकर स्वीकारल्या जात आहेत. त्याचवेळी आम्ही महाराष्ट्रात 650हून अधिक ट्विन्स विकल्या आहेत, ही नोंदही उत्‍साहवर्धक आहे. पुणे शहराने आमच्या मोटरसायकल्सप्रती तसेच आम्ही देत असलेल्या शुद्ध आणि निखळ मोटरसायकलिंगच्या अनुभवाप्रती कायमच प्रेम व्यक्त केले आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.