Pune : महिला सन्मान योजनेचा जिल्ह्यात तीन लाखाहून अधिक महिला प्रवाशांनी घेतला लाभ

एमपीसी न्यूज – राज्याच्या 2023-24 च्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना (Pune) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्या अनुषंगाने महामंडळाने 17 मार्च 2023 पासून महिला सन्मान योजना कार्यान्वित केली असून 23 मार्चपर्यंत पुणे विभागातील बसेसमधून एकूण 3 लाख 10 हजार 138 महिला प्रवाशांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. 

जिल्ह्यात शिवाजीनगर आगारातून 16 हजार 902, स्वारगेट 15 हजार 558, भोर 27 हजार 192, नारायणगाव 52 हजार 88, राजगुरुनगर 41 हजार 531, तळेगाव 14 हजार 105, शिरुर 19 हजार 522, बारामती 40 हजार 952, इंदापूर 32 हजार 309, सासवड 15 हजार 817, दौंड 10 हजार  256, पिंपरी-चिंचवड 8 हजार 996, एमआयडीसी 14 हजार 910 असे एकूण जिल्ह्यात 3 लाख 10 हजार 138 महिला प्रवाशांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. यातून एसटी महामंडळाला 89 लाख 14 हजार 138 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

Pavana Bank Election : पवना बँकेच्या निवडणुकीतून आठ जणांची माघार

एसटी महामंडळाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना 33 टक्के पासून १०० टक्के पर्यंत (Pune) प्रवासी तिकीट दरात सवलत देते. यापूर्वीही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त राज्य शासनाने 75 वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून मोफत प्रवासाची सवलत जाहीर केली आहे. तसेच 65 ते 75 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्यात येत आहे. या सवलतींची प्रतिपूर्ती रक्कम राज्य शासनाकडून महामंडळाला देण्यात येत आहे, अशी माहिती पुणे विभागीय नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.