Pune : खासदार गिरीश बापट यांनी केले महापौर-उपमहापौर यांचे अभिनंदन

एमपीसी न्यूज – शहराचे नूतन महापौर मुरलीधर मोहोळ तसेच उपमहापौर सरस्वती शेंडगे यांचे खासदार गिरीश बापट यांनी आज महापालिकेच्या सभागृहात उपस्थित राहून अभिनंदन केले.

या दोघांच्या नेतृत्वाखाली शहराचा आणखी जोमाने विकास होईल, याची मी पुणेकरांना खात्री देऊ इच्छितो. मावळत्या महापौर मुक्ता टिळक तसेच उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांच्या नेतृत्वाखाली या शहरामध्ये अनेक विकासकामे सुरू झाली आहेत. ही विकासकामे पूर्ण करूनच आणखी नाविन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून शहराचा विकास करायचा आहे.

मुरली मोहोळ यांच्या नेतृत्वाखाली सर्व भाजप नगरसेवक यासाठी सतत प्रयत्नशील राहतील, असा मला विश्वास आहे, असेही बापट म्हणाले. यावेळी भाजपच्या पुणे शहराध्यक्ष माधुरी मिसाळ, मावळत्या महापौर मुक्ता टिळक, नगरसेवक अजय खेडेकर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like