Girish Bapat : खासदार गिरीश बापट यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात 

मंत्री प्रकाश जावडेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,पालकमंत्री चंद्रकांत पाटील अंत्ययात्रेत सहभागी 

एमपीसी न्यूज : पुणे शहराचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली असून अंत्ययात्रेत मंत्री प्रकाश जावडेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,पालकमंत्री चंद्रकांत पाटील सहभागी झाले आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार गिरीश बापट यांच प्रदिर्घ आजाराने आज दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले .खासदार गिरीश बापट यांच्या मागे पत्नी,मुलगा,सून आणि नात असा परिवार आहे.तर शनिवार पेठेतील निवासस्थानी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात आले होते.  साडे पाच वाजण्याच्या सुमारास त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली.

Wakad : शेअर मार्केट मध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने 11 लाखांची फसवणूक

 

त्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,पालकमंत्री चंद्रकांत पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, उपसभापती नीलम गोऱ्हे,भाजपच्या नेत्या (Girish Bapat) पंकजा मुंडे,आमदार माधुरी मिसाळ,आरोग्यमंत्री तानाजी सावंत,खासदार श्रीनिवास पाटील, ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळीनी अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली वाहिली.मंत्री प्रकाश जावडेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे पायी चालत अंत्ययात्रेत सहभागी झाले आहेत..

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.