Pune: एमपीसी न्यूजचे संपादक विवेक इनामदार यांचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते गौरव

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामाबद्दल एमपीसी न्यूजचे संपादक विवेक इनामदार  यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज स्मृतिचिन्ह आणि शाल देऊन गौरविण्यात आले.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने जीवन गौरव पुरस्काराने जगी वासुदेव आणि महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी दैनिक पुढारीचे डॉ. योगेश जाधव यांची निवड झाल्याबद्दल विशेष गौरव केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आला. स्मृतिचिन्ह, मानपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे संघटक संजय भोकरे, खासदार अनिल शिरोळे हे उपस्थित होते.

एमपीसी न्यूज चे संपादक विवेक इनामदार यांच्या विषयी थोडक्यात ;
लोकसत्ता मध्ये वार्ताहर, वरीष्ठ वार्ताहर, मुख्य वार्ताहर म्हणून 16 वर्ष काम केले. तर पिंपरी चिंचवड येथे एबीपी माझा या वृत्त वाहिनीचे विशेष प्रतिनिधी म्हणून साडेचार वर्ष काम केले. तर याच दरम्यान 22 जुलै 2008 साली एमपीसी न्यूज डॉट इन हे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील पहिले मराठी सिटी न्यूज पोर्टल सुरू केले.

उत्कृष्ट पत्रकार म्हणून विवेक इनामदार यांच्यासह पत्रकार नम्रता फडणीस , पत्रकार समीर कोडीलकर , पत्रकार पराग पोतदार ,आणि पत्रकार मेघ शिंपी यांचाही गौरव करण्यात आला

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.