Pune : एमपीसी न्यूजचे संपादक विवेक इनामदार यांना आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राचा पुरस्कार जाहीर

एमपीसी न्यूज – आनंदवन व्यसनमुक्ती व पुर्नवसन केंद्र व मनोविकास मानसोपचार केंद्राच्या वतीने ‘एमपीसी न्यूज’चे संपादक विवेक इनामदार यांना डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

आनंदवन व्यसनमुक्ती व पुर्नवसन केंद्र व मनोविकास मानसोपचार केंद्राच्या वतीने महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने पुण्यातील काही ज्येष्ठ पत्रकारांचा युवा गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. पुण्यात टिळक रस्त्यावरील अभिनव चौकाजवळ विशाल सह्याद्री सदन येथे उद्या (शुक्रवार) संध्याकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार व लेखक भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. अजय दुधाणे यांनी दिली.

सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे, सामाजिक कार्यकर्त्या श्यामलताई देसाई, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पुणे शहर अध्यक्ष सोमनाथ देशकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

पुरस्कार विजेत्या पत्रकारांमध्ये मंगेश कोळपकर (सकाळ), चैत्राली चांदोरकर (महाराष्ट्र टाईम्स), लक्ष्मण मोरे (लोकमत), स्वप्नील बापट (आज का आनंद), सुनिल जगताप (पुढारी) नम्रता देवीकर (सकाळ टाईम्स) सायली कुलकर्णी (अध्यक्षा, पि.चिं. पत्रकार संघ) वृत्त छायाचित्रकार – शहाजी जाधव (सकाळ), कपिल पवार (लोकमत) पवन खेंगरे (इंडियन एक्सप्रेस), संदीप बोडके (प्रभात), डिजीटल मिडीया पत्रकार – मिकी घई (एबीपी माझा) अमोल धर्माधिकारी (जय महाराष्ट्र न्यूज), अश्‍विनी पवार (झी 24 तास), सागर आव्हाड (टीव्ही-9), अमोल कविटकर (साम) आणि विवेक इनामदार (एमपीसी न्यूज) यांचा समावेश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.