Pune: एमपीसी न्यूज आणि देवदत्त फोटोग्राफी स्कूलतर्फे ‘लॉकडाऊन’ फोटोग्राफी स्पर्धेचे आयोजन

क्लिक करा लॉकडाऊनच्या काळातील कुटुंबाबरोबरचे अविस्मरणीय क्षण!

एमपीसी न्यूज – mpcnew.in  व  देवदत्त  फोटोग्राफी  स्कूल यांच्या संयुक्त  विद्यमाने एक अनोखी छायाचित्र स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. मागील अनेक दिवसांपासून आपण सर्वजण  ‘लॉक डाऊन’ला सामोरे जात आपापल्या घरी आहोत.  अजूनही ‘लॉक डाऊन’ संपले नसून अजूनही काही कालावधी आपल्याला घरी थांबावे लागणार आहे. या काळात आपण आपल्या कुटुंबाला यापूर्वी कदाचित कधीही दिला नसेल एवढा वेळ देत आहोत. याच वेळी आपण घरात आपल्या कुटुंबाच्या सदस्यांचे वेगवेगळ्या गोष्टी  करताना आपापल्या मोबाईल कॅमेऱ्याने फोटो काढत आहोत. असेच आपल्या घरी असलेल्या कोणत्याही कॅमेराने, मोबाईलने काढलेल्या घरातील फोटोंची आम्ही एक फोटोग्राफी स्पर्धा घेऊन येत आहोत. ज्यात आहेत  भरघोस बक्षिसे व ट्रॉफीज!

 • प्रथम  क्रमांक – रक्कम  रु 3,000/- व ट्रॉफी
 • व्दितीय  क्रमांक – रक्कम रुपये 2,000/- व ट्रॉफी
 • तृतीय क्रमांक  –    रक्कम रुपये 1,000 /- व ट्रॉफी 
 • उतेजनार्थ –  एकूण 5 बक्षिसे – प्रत्येकी – एक  ट्रॉफी

याशिवाय तुमच्या उत्तम छायाचित्रांना योग्य प्रसिद्धी नावासह देण्यात येईल.

स्पर्धेचे नियम पुढील प्रमाणे 

 1. फोटो मोबाईल किंवा कोणताही कॅमेराने काढलेले असले तरी चालतील, पण एक व्यक्ती जास्तीत जास्त 3 फोटो पाठवू शकते.
 2. एका कुटुंबातून कितीही माणसे या स्पर्धेत भाग घेऊ शकतात.
 3. फोटो सेल्फी प्रकारात असल्यास चालणार नाही, कारण ही सेल्फीची स्पर्धा नाहीये.
 4. फोटो  झिप  करून पाठवू नयेत, सरळ jpg प्रकारात मेल करावेत.
 5. संपूर्ण जगभरातून कुणीही व्यक्ती या स्पर्धेत सहभाग घेऊ शकते.
 6. फोटो एडिट केलेले नसावेत.
 7. कुटुंबातील विविध वयोगटातील व्यक्तींच्या भावभावना, घरातील गमतीजमती, खेळकर क्षण, घरात राहून सुरु झालेली नवीन दिनचर्या, असे एकूण घरात व घरातीलच विविध क्षण तुम्ही टिपलेले असतील, ते क्षण आपण या स्पर्धेला पाठवू शकता.
 8. फोटो पाठवण्याची अंतिम मुदत 28 एप्रिल 2020 राहील. मुदतीनंतर आलेले फोटो स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत.
 9. प्रत्येक ई-मेलमध्ये स्पर्धकाने आपले संपूर्ण नाव, पत्ता व मोबाईल नंबर देणे अतिशय महत्त्वाचे आहे.
 10. देवदत्त फोटोग्राफी स्कूल, चिंचवड यांच्याकडून स्पर्धेचे परीक्षण केले जाईल. परीक्षकांचा  निर्णय अंतिम राहील.

पुढील ई-मेल ऍड्रेसवर वर उल्लेख केल्याप्रमाणे फोटो पाठवावेत. 
[email protected]
मग वाट कसली पहाताय, उचला फोन किंवा कॅमेरा काढा फोटो व जिंका बक्षिसे!

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like