Pune MPSC : 31 तास उलटले तरी एमपीएससीचे विद्यार्थी रस्त्यावरच!

एमपीसी न्यूज : मागील 31 तासांहुन अधिक वेळ होऊन गेला तरीही एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे (Pune MPSC Student Protest) आंदोलन सुरुच आहे. नवी परीक्षा पद्धती 2025 पासून लागू करण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. दोन रात्र उलटूनही पुण्यातल्या झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात विद्यार्थी बसून आहेत.

ऊन, वारा याची पर्वा न करता विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच आहे. जानेवारीच्या अखेरीस राज्य सरकारने नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु,  त्याची  अंमलबजावणी पुढे ढकलली होती. मात्र, आता तीन आठवडे उलटूनही यावर काहीही कार्यवाही होत नसल्याने विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर उतरले आहेत.

नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू व्हावा यासाठी राज्य सरकारकडून पत्र देण्यात आलं मात्र सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव गद्रे यांनी ते लोकसेवा आयोगाला दिलेच नाही असा दावा अभिमन्यू पवार यांनी केला आहे, आंदोलनस्थळी राष्ट्रवादी कोंग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देखील भेट देऊन विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त असल्याचे म्हंटले आहे.

Pune : वंचितांचे छत्र हरपले; भीषण अपघातात सेवाभावी सुदामकाकांसमवेत कुटुंबातील तिघांचा मृत्यू

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.