Pune : महापारेषणची 132 केव्ही वाहिनी तुटल्याने बाणेर, बालेवाडी, पाषाणमध्ये वीजपुरवठा खंडित

एमपीसी न्यूज – महापारेषण कंपनीची 132 केव्ही क्षमतेची रहाटणी येथील वीजवाहिनी तुटल्याने मंगळवारी सकाळी सव्वानऊच्या सुमारास 132 केव्ही एनसीएल उपकेंद्राचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. या उपकेंद्रावर वीजपुरवठ्यासाठी अवलंबून असलेल्या काही भागात पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

परंतु भारव्यवस्थापन शक्य नसल्याने बाणेर, बालेवाडी परिसर तसेच सुस रोड, पाषाण, बावधन, औंधच्या काही परिसरातील वीजपुरवठा सध्या खंडित आहे. महापारेषणकडून 132 केव्ही वाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून, आज दुपारी तीन वाजेपर्यंत ते पूर्ण होणार असल्याचं महावितरणकडून सांगण्यात आले आहे. त्यानंतर बाणेर बालेवाडी व इतर भागातील वीजपुरवठा पूर्ववत होणार आहे वीज ग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.