Pune : कॉसमॉस बँकेचे संचालक राहिलेल्या मुकुंद अभ्यंकर यांना 6 महिन्याच्या कारावासाची शिक्षा

एमपीसी न्यूज-भरधाव वेगात कार चालवत ( Pune ) दुचाकीस्वार महिलेला धडक देऊन तिच्या मृत्यूला कारणीभूत राहिलेल्या मुकुंद अभ्यंकर यांना सहा महिने कारावासाची शिक्षा कोर्टाने ठोठावली आहे. मुकुंद लक्ष्मण अभ्यंकर हे कॉसमॉस बँकेचे अनेक वर्ष संचालक राहिले आहेत.

प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. सी. दुगांवकर यांनी हा निकाल दिला. दंडाची रक्कम न भरल्यास एक महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असे आदेशात नमूद आहे.

भांडारकर रस्त्यावरील अभ्युदय बँकेसमोर 17 जुलै 2016 रोजी हा अपघात झाला होता. या अपघातात अरुंधती गिरीश हसबनीस (वय 30 रा. नर्हे) यांचा मृत्यू झाला होता. अभ्यंकर यांनी भरधाव कार चालवित अरुंधती हसबनीस यांच्या दुचाकीला धडक देऊन त्यांच्या डोक्यावरून कारचे चाक घातले होते. अपघातानंतर मुकुंद अभ्यंकर यांनी बेजबाबदारपणे गाडी चालवत घटनास्थळावरून पळ काढला होता.

IPL 2023-गुजरात टायटन्सला अखेरच्या चेंडूवर नमवत सीएसके पाचव्यांदा चॅम्पियन

याबाबत विक्रम सुशील धूत ( वय 35, रा. शिवाजीनगर ) यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

या खटल्यात सरकारी वकील गिरीश बारगजे यांनी 17 साक्षीदार तपासले. दरम्यान, बचाव पक्षाच्या वतीने युक्तिवाद करताना  ॲड. ऋषिकेश गानू म्हणाले, फिर्यादी पक्षाने दाखल केलेला सर्व पुरावा खोटा असून तो मान्य नाही. तसेच, सर्व साक्षीदार हे बनावट असून त्यांची साक्ष खोटी असल्याचे युक्तिवादात सांगितले.

ॲड. बारगजे यांनी आरोपीने केलेला गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे. त्याला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी केली. सरकारी वकिलांना फिर्यादीतर्फे ॲड. सूर्यकुमार निरगुडकर, ॲड. ऋग्वेद निरगुडकर आणि ॲड शशांक वकील यांचे सहाय्य लाभले. न्यायालयीन कामकाजात सहायक पोलीस फौजदार खानेकर, हवालदार काकडे, भुवड, मोरे यांनी मदत ( Pune ) केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.