Pune : ‘वायसीएम’च्या धर्तीवर खडकवासला मतदारसंघात मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल करा -सुप्रिया सुळे

एमपीसी न्यूज – बारामती लोकसभा मतदारसंघात पुणे महापालिकेच्या खडकवासला हद्दीत येणाऱ्या शहारी भागात ‘वायसीएम’च्या धर्तीवर सर्व सुखसोयींनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल करण्यात यावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

हे पत्र विरोधी पक्षनेते दीपाली धुमाळ, माजी विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, नगरसेवक सचिन दोडके, प्रकाश कदम, बाळा धनकवडे, नगरसेविका अमृता बाबर, अश्विनी भागवत, पुणे शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ यांच्या उपस्थितीत आयुक्तांना देण्यात आले.

_MPC_DIR_MPU_II

खडकवासला मतदारसंघात सातत्याने नागरिकीकरण वाढत आहे. याशिवाय गरीब लोकांनाही मोफत अथवा अत्यंत अत्यल्प दारात आरोग्य सुविधा मिळतील. नागरिकांना सोयीचे पडेल, अशा ठिकाणी सर्व सोयींनीयुक्त असे रुग्णालय असणे गरजेचे आहे. त्यामुळे अल्प उत्पन्न गटातील लोकांना उच्च दर्जाच्या सर्व आरोग्य सुविधा वेळेत मिळणे सोईचे होईल.

या रुग्णालयासाठी राज्य शासन आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी पत्रात म्हटले आहे. या भागात हे रुग्णालय तातडीने होण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.