Pune News – एअर इंडिया तर्फे पुणे मुंबई विमान सेवा सुरू होणार

एमपीसी न्यूज – एअर इंडिया कंपनी ही 26 मार्च पासून पुणे ते मुंबई अशी विमान सेवा सुरू करत आहे. सध्या या मार्गावर एकही विमानसेवा चालू नाही आहे.(Pune News) परंतु 26 मार्चपासून एअर इंडियाचे विमान शनिवार व्यतिरिक्त रोज पुणे ते मुंबई प्रवास करेल. तसे बघायला गेले तर दोन्ही शहरांमध्ये साधारण 130 किलोमीटर अंतर आहे. दोन्ही शहरे जोडण्यासाठी उत्तम बस सेवा आणि रेल्वे सेवा उपलब्ध आहेत. परंतु तरीही एअर इंडियाने पुणे मुंबई विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

मुंबईहून दररोज सकाळी 9 वाजून 45 मिनिटांनी सुटणारे विमान पुण्याला 10 वाजून 50 मिनिटांनी पोचेल. पुण्यात 30 मिनिटे थांबल्यानंतर पुन्हा मुंबईच्या दिशेने 11 वाजून 20 मिनिटांनी उड्डाण करेल आणि मुंबईला 12 वाजून 20 मिनिटांनी पोचेल. याचा फ्लाइंग टाइम 1 तास असून, यासाठी एटीआर-72 या विमानाचा वापर केला जाणार आहे.

 

MPC News Podcast 23 March 2023 – ऐका…आजचे एमपीसी न्यूज पॅाडकास्ट

 

पंधरा वर्षांपूर्वी म्हणजे 2008 मध्ये पुणे-मुंबई-दिल्ली अशी दररोज विमानसेवा सुरू होती. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. (Pune News)त्यानंतर 2017 मध्ये जेट एअरवेजने पुणे ते मुंबई थेट विमानसेवा सुरू केली. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. मात्र, ती सेवा काही कारणांमुळे 2019 मध्ये बंद झाली. त्यानंतर विमानसेवा सुरू करण्याबाबत केवळ चर्चा झाल्या. प्रत्यक्षात मात्र ही विमानसेवा चार वर्षानंतर सुरू होत आहे.

 

पुणे-मुंबई दरम्यान विमानसेवा सुरू करण्यासाठी पुणे विमानतळ प्रशासन मागील काही दिवसांपासून प्रयत्न करीत आहे. विंटर शेड्यूलमध्ये पुणे व मुंबई विमानतळावर स्लॉट राखीव ठेवला होता.(Pune News) मात्र त्यावेळी एअर इंडियाकडून अपेक्षित प्रतिसाद लाभला नसल्याने तो स्लॉट रद्द केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.