Pune: मुंबई, पुणे विकासाच्या नावाखाली बकाल झाले – राज ठाकरे

एमपीसी न्यूज – पुणे, मुंबई ही शहर पूर्वी खूपच सुंदर होती. पण, आता प्रगतीच्या नावाखाली ती विस्कटत जात आहेत. शहर नुसती वाढत जात आहेत. त्याला आकार उरला नाही. केवळ विकासाच्या नावाखाली पुणे, मुंबई शहरे बकाल झाल्याचे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे. ही शहर छान राहावीत. त्यासाठी धोरण आखणे गरजेचे असते. हे धोरण ठरवणारे लोकप्रतिनिधी असतात, त्यांना निवडणून देण्यासाठी ही निवडणूक आहे, असेही ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात राज ठाकरे जाहीर सभा घेत प्रचार करत आहेत. सभेच्या माध्यमातून भाजप आणि त्यांना सहकार्य करणा-या मित्रपक्षांना मतदान करु नये, असे आवाहन करत आहेत. नांदेड, सोलापूर, इंचलकरंजी, साता-यानंतर ठाकरे त्यांची आज (गुरुवारी) पुण्यात सभा होत आहे. सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग येथील गोयल गंगा मैदानावर ही सभा सुरु आहे.

  • पुणे, मुंबई शहर प्रगतीच्या नावाखाली विस्कटत आहे. विकास जगभरात होतो. परंतु, ती शहरे प्रगती करून देखील टुमदार होतात. आपली शहरे मात्र बकाल होत जातात. शहर वाढत आहेत. वाढत्या शहरांमध्ये पुरेसे पार्किंग नाही. महाविद्यालये, रुग्णालये नाहीत, असे राज ठाकरे म्हणाले.

सुप्रिम कोर्टाच्या न्यायाधिशांनी पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली. आमच्यावर दबाव येत असल्याचे सांगतात. देशाची लोकशाही धोक्यात असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारच्या दडपणामुळे रिझर्व्ह बँकेच्या दोन गर्व्हनरनी राजीनामा दिला. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच मोदी यांच्या राजवटीत असे झाले आहे. एका रात्रीत झटका आला आणि नोटबंदी केली. झटका आला म्हणून केलेली नोटाबंदी पूर्णपणे फसली आहे. देशाला अनेक प्रश्न पडलेत पण, नरेंद्र मोदींना उत्तरेच द्यायची नाहीत, असेही राज ठाकरे म्हणाले.

  • मुंबई-अहमादाबादमध्ये मेट्रोची काय आवश्यकता का आहे? सर्व विदेशी नेत्यांना गुजरातमध्ये का नेतात? गुजरातचे व्यापारी व्यावसायासाठी महाराष्ट्रात का येतात?, देशभर पैसे वाटायला भाजपडे पैसे कुठून आले?. देशभरात पक्षाची प्रशस्त कार्यालये कशी उभारली आहेत?. त्यासाठी पैसे कुटून आणले आहेत? रामदेव बाबांचा इतका व्यापार कसा वाढला? असा सवाल करत बाबा रामदेव हा माणुस गुजरातपुरतचा बरा आहे, असेही ठाकरे म्हणाले.

दिवंगत आमदार रमेश वांजळे यांच्या आठवणीने राज ठाकरे भावूक
मनसेचे दिवंगत आमदार रमेश वाजळे यांची आठवण राज ठाकरे यांनी काढली. माझा वाघ गेला. आज तो असायला हवा होता. मी खडकवासला येथून जाताना वाजळे यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. या परिसरातून जाताना त्याची नेहमी आठवण येते, हे सांगताना राज ठाकरे भावूक झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.