Pune news : मनपा सेवकांसाठी अंशदायी आरोग्य योजना रहावी, खाजगी विम्याचा घाट नको

एमपीसी न्यूज : पुणे महापालिका सेवकांसाठी अस्तित्वातील अंशदायी सहाय्य योजना मोडीत काढून मेडिक्लेम अंतर्गत खाजगी विम्याचा घाट हे प्रशासक पुन्हा घालु पहात आहेत, (Pune news) ही खेदाची बाब असून, पुणे मनपा प्रशासकांनी (अस्तित्वातील केंद्र व राज्य सरकार मान्य) अंशदायी आरोग्य सेवा योजना सूरू ठेवावी व नवीन लोकप्रतिनिधींची बॅाडी अस्तित्वात आल्यावरच नविन धोरणात्मक बाबींवर निर्णय घ्यावेत, अशी मागणी करणारे निवेदन विभागीय आयुक्तांना दिल्याचे काँग्रेस नेते व राजीव गांधी समिती संस्थापक गोपाळदादा तिवारी यांनी सांगितले.

वास्तविक या बाबत पुर्वी देखील मनपा सेवक संघटनांनी खाजगी विमा योजनांचा घाट घालू नये’ या करीतां आंदोलन ही सूरू केले होते परंतू त्याच दिवशी मनपा सेवक संघटनेची समजुत काढून, मनपा प्रशासनाने ते रद्द करण्याचे आश्वासन देऊन, अंशदायी आरोग्य सेवा योजनाच पुर्ववत सुरू राहील असा भरवसा दिला मात्र  प्रत्यक्षात मात्र ऊलटे घडत असल्याचे निदर्शनास आले आहे..! सीएचएस विमा योजनेची मनपा पोर्टल वर विमा कपन्यांची टेंडर्स मागवण्यात आली आहेत व प्रशासकांचे समोर विमा कंपन्यांचे सादरीकरण देखील करण्यात आले.(Pune news) ही खेदाची बाब असून या बाबत पुणे मनपा नक्की काय करू ईच्छीत आहे…? वास्तविक मनपा लोकप्रतिनिधींची मुदत संपलेमुळे मनपा-बरखास्त झाली असतांना.. मा आयुक्त प्रशासक या नात्याने कोणाच्या दबावाखाली निर्णय घेत आहेत..? राज्यातील सत्तापक्षाचा दबाव आहे काय..? अशी विचारणा देखील राजीव गांधी स्मारक समिती सदस्यांनी मा विभागीय आयुक्त श्री सौरभ राव यांना केली व निवेदन ही दिले…!

Pune Womens Navratri : पुणे महिला नवरात्रोत्सवात हजारो महिलांची महाआरती संपन्न

तसेच, मनपाचे नविन लोकप्रतिनिधी (बॅाडी) निवडून येई पर्यंत (धोरणात्मक निर्णय न घेण्याते संकेत असतांना) मा प्रशासक श्री विक्रम कुमार यांनी नवीन घोरणात्मक निर्णय घेऊ नयेत अशी विनंती करणारे निवेदन दीले.. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करावयास लागेल, याचा ही ईशारा दिला.(Pune news) खाजगी मेडिक्लेम कंपन्याच्या दावणीला मनपा सेवकांना बांधणे अन्याय कारक असुन, कामगार बंधू च्या पाठीशी आम्ही सदैव राहू असे ही सुचित केले..

या शिष्टमंडळात, काँग्रेस नेते गोपाळदादा तिवारी, सर्वश्री सुर्यकांत ऊर्फ बाळासाहेब मारणे, सुभाष थोरवे, भोला वांजळे, संजय अभंग, लहू आण्णा निवंगुणे, ॲड फैयाज शेख, विकास दवे, अमर गायकवाड उपस्थित होते. सौरभ राव यांनी यामध्ये जातीने लक्ष घालण्याचे आश्वासन शिष्टमंडळास दिले.

=

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.