Pune: अंत्यविधी व अन्य धार्मिक संस्कार प्रसंगी गर्दी टाळण्याचे मनपा प्रशासनाचे आवाहन

एमपीसी न्यूज – शहरात कोरोनाचा प्रसार आणखी वाढू नये, यासाठी महापालिकेने व शासनाने गर्दीची ठिकाणे टाळण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. त्याचाच भाग म्हणून नागरिकांनी अंत्यविधी व अन्य धार्मिक संस्कार प्रसंगी गर्दी टाळावी, असे आवाहन देखील पुणे महापालिका प्रशासनाने केले आहे. 

सद्यस्थितीमध्ये कोरोना विषाणू प्रादुर्भाव परिस्थितीचा विचार करून पुणे महानगरपालिकेच्या वतीने युद्धपातळीवर प्रतिबंधात्मक सर्व पातळ्यांवर प्रभावी उपाययोजना करण्यात येत आहेत.  शहरात होणाऱ्या गर्दीच्या ठिकाणी सर्वोतोपरी गर्दी टाळणेकरिता यशस्वी प्रयत्न केले जात आहेत. तथापि, अंत्यविधी व त्यानंतर होणारे धार्मिक संस्कार प्रसंगी गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही

सद्यस्थिती बाबत विचार करून सर्वांनी मिळूनच गर्दी नियंत्रणात व आटोक्यात आणणे करिता प्रयत्न करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी केले आहे.  मयतांचे मृत्यूपास व मृत्यूदाखले मिळणे बाबत त्वरेने पूर्तता होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाचे वतीने आज सिंहगड रस्ता पु. ल. देशपांडे उद्यानासमोरील परिसरात घरोघरी भेटी देउन मार्गदर्शन व जनजागृती करण्यात आली. सुमारे 254 घरांना भेटी देऊन 817 नागरिकांशी संवाद साधण्यात आला.  सर्वेक्षण करण्यापूर्वी पथकातील समूहसंघटिका, आरोग्य कर्मचारी,नर्सेस,व अन्य कर्मचाऱयांना डॉ. दीपक पखाले, डॉ. वीर यांनी मार्गदर्शन केले.  पथकासह घरोघरी भेटी देण्यात आल्या.

नायडू रुग्णालयात किटकनाशक औषध फवारणी

कै.  बा. स. ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाचे वतीने मंगळवारी डॉ. नायडू रुग्णालयात किटकनाशक औषध फवारणी करण्यात आली. तसेच, विभागीय आयुक्त कार्यालय परिसर व बाहेरील परिसरात कीटकनाशक औषध फवारणी करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.