Pune : महापालिकेची सायकल योजना गुंडाळली!

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेने मोठा गाजावाजा करून सुरू केलेली सायकल योजना आता गुंडाळल्यातच जमा आहे. सायकल याेजनेसाठी अंदाजपत्रकातील तरतुदीचे वर्गीकरण करण्याचे प्रस्ताव स्थायी समितीसमाेर येत आहेत.

प्रदूषण कमी करण्यासााठी सायकलचा वापर वाढावा म्हणून पुणे हापािलकेने २०१६ मध्ये सायकल याेजना राबविण्याचा निर्णय घेतला. पुणे शहरांत सुमारे 300 किलोमीटरचा सायकल ट्रॅक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. सायकलचा वापर वाढावा. यासाठी काही कंपन्यांनी सायकल उपलब्धता करून दिल्या होत्या. सुमारे ८० हजार सायकल संपुर्ण शहरांत उपलब्ध करून देण्याचे उद्दीष्ट महापािलकेने ठरविले हाेते. पण, सायकल योजनाच आता गुंडाळली आहे.

क्रमांक ४२ मध्ये सायकल ट्रॅक उभारण्यासाठी 50 लाख रुपये तरतुद हाेती. ती रस्ता डांबरीकरण व ड्रेनेजलाईन टाकण्याच्या कामासाठी वर्ग करण्यात येईल. प्रभाग क्रमांक 30 मध्ये सायकल ट्रॅककरीता 40 लाख रुपयांची तरतुद केली हाेती. त्याचे वर्गीकरण करण्याचा प्रस्ताव सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी दिला आहे. ही तरतुद ज्येष्ठ नागरीकांसाठी विरंगुळा केंद्र उभारण्यासाठी वापरली जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.