Pune : महापालिका आयुक्त सौरभ राव 24 जानेवारी रोजी बजेट मांडणार

एमपीसी न्यूज – पुणे महापालिका आयुक्त सौरभ राव शुक्रवारी (दि. 24 जानेवारी) 2020 – 21 चे बजेट मांडणार आहेत. महापालिकेचे घटत असलेले उत्पन्न आणि वाढलेला खर्च त्या पार्श्वभूमीवर आयुक्त नेमके किती कोटींचे अंदाजपत्रक सादर करणार?, याकडे लक्ष लागले आहे.

सर्वसाधारण सभेने मंजुरी दिलेले 2019 – 20 चे बजेट हे साधारण चार ते साडे चार हजार कोटींची आसपास जाण्याची शक्यता आहे. स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी महसूल समिती कक्ष स्थापन करून महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यावर भर दिला आहे. बांधकाम क्षेत्रात प्रचंड मंदी आहे.

नोटबंदी, जीएसटी, रेरामुळे घरांना उठावच नाही. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात घट होत आहे. समान पाणीपुरवठा, नदी सुधार प्रकल्प (जायका), चांदनी चौक उड्डाणपूल या प्रकल्पांसाठी हजारो कोटी रुपये लागणार आहेत. आयुक्त त्यासाठी कशी तरतूद करणार याकडे लक्ष लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.