Pune: महापालिका आयुक्तांचा सोमवारी अर्थसंकल्प ; पुणेकरांना काय मिळणार?

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त शेखर गायकवाड सोमवारी (दि. 27 जानेवारी) सकाळी 11 वाजता 2020 – 21 चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यामध्ये पुणेकरांना काय मिळणार, याकडे लक्ष लागले आहे.

 

तत्कालीन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सुचविल्याप्रमाणे स्थायी समितीने तब्बल 6 हजार 765 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले होते. गायकवाड सुध्दा नेमके किती कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर करणार याची उत्सुकता आहे.

 

चांदणी चौक उड्डाणपूल, समान पाणीपुरवठा, मेट्रो, शिवसृष्टी, बालगंधर्व रंगमंदिर पुनर्विकास, असे अनेक प्रकल्प महापालिकेचे सुरू आहेत. महापालिकेचा अर्थसंकल्प 7 हजार कोटींच्या आसपास जाण्याची शक्यता असताना, 2 हजार कोटींची तूट येणार असल्याचे बोलले जात आहे.

 

नोटबंदी, जीएसटी, रेरा या लागोपाठ लावण्यात आलेल्या कायद्यांमुळे बांधकाम क्षेत्रात प्रचंड मंदी आहे. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात घट झाली आहे. पुणेकरांवर कोणतीही करवाढ न करता मिळकत करातील गळती भरून काढण्यासाठी स्वतंत्र महसूल कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्यासाठी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आढावा घेण्याचे काम सुरू केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.