Pune : महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी 2024 – 25 या वर्षीचे 11 हजार 601 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक केले सादर

एमपीसी न्यूज : – पुणे महापालिकेचे 2024- 25 या वर्षीचे 11 हजार 601 कोटी रुपयांचे (Pune) अंदाजपत्रक आज महापालिका आयुक्त आणि प्रशासक विक्रम कुमार यांनी सादर केले. समाविष्ट गावांतील विकासासाठी 550 कोटी रुपये भरीव तरतूद करण्यात आली असून पायाभूत सुविधांसाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. येत्या वर्षभरात ही कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न राहतील, अशी माहिती आयुक्तांनी पत्रकार परिषदेत दिली.

मेट्रोचे नवीन रूट, पीएमपीएमएल साठी 500 बसेस, ड्रेनेज आणि रस्त्यांच्या मिस्सिंग लिंकच्या कामासाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. जायका अंतर्गत सुरू असलेले एसटीपी प्लांट उभारणी, नदी काठ सुधार योजना ही कामे देखील मार्गी लावण्यात येतील. शहरातील तीन तलावांच्या सुशोभीकरणाची कामे सुरू करण्यात येणार आहेत. कचऱ्यापासून वीज आणि हायड्रोजन निर्मिती चे प्लांट सुरू करण्यात येणार आहेत, असेही आयुक्तांनी सांगितले.

शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी मॉडेल स्कूल योजनेत अधिकच्या शाळा घेण्यात येणार आहेत. तर, सर्वसामान्य लोकांना स्वस्त दरात औषधं मिळावीत यासाठी जेनेरिक स्टोरची संख्या वाढवण्यात येणार आहे.

Pimpri: जुन्या भांडणाच्या कारणावरून एकास मारहाण

मुख्य विभागांसाठी तरतूद

1. पाणी पुरवठा – 1 हजार 537 कोटी रुपये
2. ड्रेनेज – 1 हजार 263 कोटी रुपये
3. घनकचरा – 922 कोटी 92 लाख रुपये
4. आरोग्य – 516 कोटी रुपये
5. वाहतूक नियोजन व प्रकल्प – 764 कोटी रुपये.
6. पथ विभाग – 1 हजार 278 कोटी 90 लाख रुपये.
7. पीएमपीएमएल – 482 कोटी 52 लाख रुपये
8. उद्यान – 171 कोटी 78 लाख रुपये. (Pune)
9. विद्युत – 432 कोटी 44 लाख रुपये.
10. भवन – 515 कोटी 92 लाख रुपये.
11. माहिती व तंत्रज्ञान – 44 कोटी 58 लाख रुपये.
12. हेरिटेज – 19 कोटी 25 लाख रुपये.
13. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण – 124 कोटी 60 लाख रुपये.

असे असेल उत्पन्न

1.मिळकत कर – 3 हजार 2 कोटी
2.बांधकाम परवानगी शुल्क – 2 हजार 492 कोटी 83 लाख रुपये.
3. स्थानिक संस्था कर – 495 कोटी
4. वस्तू आणि सेवा कर – 2 हजार 502 कोटी रुपये.
5. पाणीपट्टी – 495 कोटी.
6. शासकीय अनुदान – 1 हजार 7162 कोटी रुपये
7. इतर जमा – 833 कोटी 64 लाख रुपये
8. कर्ज/ कर्ज रोखे – 450 कोटी रुपये.

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share