Dr.Nanasaheb Dharmadhikari Pratishthan : पुणे महानगरपालिका व डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने स्वच्छता अभियानाचे आयोजन

एमपीसी न्यूज : डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान (Dr.Nanasaheb Dharmadhikari Pratishthan) हे एक सेवाभावी समाजाभिमुख उपक्रम राबविणारे प्रतिष्ठान असून पुणे शहरातील विविध भागांत दर वर्षी त्यांच्यामार्फत स्वच्छता अभियान राबविले जाते.

स्वच्छ भारत अभियानाचे महाराष्ट्र राज्याचे महामहीम राज्यपालांनी नियुक्त केलेले स्वच्छतादूत डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री पुरस्कार सन्मानित डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज 15 मे रोजी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान व पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मश्री पुरस्कार सन्मानित डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

सर्व क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत कोथरूड, केळेवाडी मधील मोगल चौक ते ARAI कंपनी गेट, किष्किंधानगर, सुतारदरा मैदान, पर्वती टेकडी, पर्वती जनता वसाहत चुनाभट्टी कॉर्नर, गोसावीवस्ती, वारजे कर्वेनगर जलशुद्धीकरण प्रकल्प, होम कॉलनी वडारवाडी, खानवस्ती रोड, रामनगर, येरवडा कळस धानोरी, स्वीपर चाळ, भैयावाडी, मदारवस्ती, धनकवडी, राऊतबाग धनकवडी, कात्रज नवीन वसाहत, कात्रजतलाव, गुगळे प्लॉट, इत्यादी ठिकाणी मोठया प्रमाणावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

या स्वच्छता अभियानाचा शुभारंभ पुणे शहर एसीपी रुख्मिणी गलांडे, तसेच पुणे मनपा उप आयुक्त घनकचरा व्यवस्थापन आशा राऊत, व समन्वयक स्वच्छ भारत अभियान यांच्या हस्ते झाला. यावेळी विरोधी पक्षनेते दिपाली धुमाळ, बारामती लोकसभा अध्यक्ष लघुअण्णा निवंगुणे, माजी नगरसेवक बाबा धुमाळ आणि पुणे महानगरपालिका व इतर मान्यवर उपस्थित होते.

T20 Cricket Tournament : सातवी ‘पुनित बालन ग्रुप महिला प्रिमियर लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धा

आशा राऊत आणि आरोग्य अधिकारी केतकी घाटगे यांनी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या (Dr.Nanasaheb Dharmadhikari Pratishthan) स्वयंसेवकांना कचरा उचलण्यासाठी कर्मचारी व कचरा गाड्या उपलब्ध करून देण्याबाबत सर्व क्षेत्रीय कार्यालयाचे आरोग्य निरीक्षक आणि विभागीय आरोग्य निरीक्षक यांना सूचना केल्या. यामध्ये शहरातील विविध ठिकाणच्या 60 झोपडपट्ट्यामधील 8.5 किलोमीटर परिसरातील 4,454 स्वयंसेवकांमार्फत एकूण 190 टन 60 किलो कचरा गोळा करण्यात आला.

पुणे महानगरपालिकेने स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी केलेले सहकार्य अत्यंत मोलाचे आहे, असे सांगून प्रतिष्ठानने पुणे महानगरपालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे (Dr.Nanasaheb Dharmadhikari Pratishthan) आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.